बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने २३ दिवसांत ४९३.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे येत्या काळात ‘गदर २’ चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. जगभरात या चित्रपटाने ६४० कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलीवूड बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीला सलमान खानने देखील हजेरी लावली होती. यादरम्यान सलमानने घातलेल्या घड्याळाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरचं एका शब्दात केलं वर्णन; म्हणाली…
‘गदर २’च्या सक्सेस पार्टीमधील सलमानचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये भाईजान काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक चर्चेत आला असून चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. पण या साध्या लूकबरोबर सलमानने घातलेल्या घड्याळाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीसाठी सलमानने सोन्याची केस असलेलं घड्याळ घातलं होतं.
सलमानने लोकप्रिय घड्याळ कंपनी रोलेक्स (Rolex)चं घड्याळ घातलं होतं. यापूर्वी बिग बॉसच्या १६व्या पर्वात हे घड्याळ सलमानने घातलं होतं, तेव्हा देखील तो या घड्याळामुळे चर्चेत आला होता. या घड्याळाला १८ कॅरेट सोन्याची केस लावली आहे. याची किंमत इंडियन वॉच कॉनेसरच्यानुसार २८ लाख ९० हजार सांगितली जाते. तर बाजारातील किंमत जवळपास ३५ लाख रुपये आहे.
हेही वाचा – “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”
दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ६ वर्षानंतर अभिनेत्री कतरिना कैफबरोबर सलमान स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.