बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ‘गदर २’च्या यशानंतर चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. आता ‘गदर ३’ बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- कंगना रणौतच्या ‘तेजस’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; दुसऱ्या दिवशी चित्रपटाने कमावले केवळ ‘एवढे’ कोटी

‘दैनिक भास्कर’मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, गदर २ ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर आता निर्माते लवकरच ‘गदर ३’ वर काम सुरू करणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा लवकरच ‘गदर ३’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे बॅकड्रॉप शूटिंग बनारसमध्ये शूट करण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून त्याचे शूटिंग सुरू होऊ शकते. १४ ते १५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले जाणार आहे. २०२४ मध्ये ‘गदर ३’ ची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये त्याचे शूटिंगही सुरू होणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ च्या आसपास हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल शर्मा फिल्म्सचे कार्यकारी निर्माता राणा भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन वर्षात ‘गदर ३’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारीही सुरू करण्यात आली आहे. ‘गदर ३’मध्ये उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांची कथा दाखवण्यात येणार आहे. मात्र, खलनायकाची भूमिका कोण साकारणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा- जावेद अख्तरांनी फ्रेंच तरुणीला केलेलं प्रपोज, पण झालं असं काही की थेट ३८ वर्षांनी झाली पुनर्भेट; तिने जपून ठेवलेली ‘ती’ गोष्ट दाखवली अन्…

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटात सनी देओलबरोबर अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.