अभिनेता सनी देओलच्या बंगल्याच्या लिलावाबाबत नवी माहिती आता समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेने ई-ऑक्शन नोटीस मागे घेतली आहे. टेक्निकल कारणामुळे ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द झाला आहे. सनी देओलने ५६ कोटींचं कर्ज घेतलं होतं जे परत न केल्याने बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहूमधल्या बंगल्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरातीनुसार २५ सप्टेंबरला हा लिलाव होणार होता. मात्र अखेर हा लिलाव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सनी देओलला मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

का देण्यात आली होती लिलावाची जाहिरात?

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला यासाठी तारण म्हणून ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओल यांनी केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अखेर हा निर्णय बँकेने मागे घेतला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सनी देओलच्या गदर २ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमा रिलिज होऊन दहा दिवस झाले आहेत. या सिनेमाने ३७५ कोटींची कमाई केली आहे. तसंच अजूनही हा सिनेमा तिकिटबारीवर बंपर कलेक्शन करतो आहे. लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये गदर २ सिनेमाचा समावेश होईल. २२ वर्षांनी गदरमधला तारा सिंग हा प्रेक्षकांना आपलंसं करतो आहे.

गदर २ सनी देओलच्या करिअरमधला सर्वात स्पेशल सिनेमा ठरला आहे. ईशा आणि अहाना यांनीही या सिनेमासाठी सनी देओलचं कौतुक केलं आहे. हेमा मालिनी यांनीही हा सिनेमा पाहून सनीचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही गदर २ सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. अशात सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द झाल्याचीही बातमी आली आहे.