दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल अशी दोन मुलं आणि अजिता व विजेता या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं, त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. अहाना लाइमलाइटपासून दूर राहते, पण ईशा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. अभिनयाबरोबरच ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशाचं तिचे सावत्र भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्याशीही जवळचं नातं आहे. पण असंही म्हटलं जातं की हेमा आणि त्यांच्या मुलींचा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि त्याच्या मुलांशी काहीही संबंध नाही. मात्र हेमा मालिनी यांच्या जीवनचरित्रात ईशा देओलने याबाबत लिहिलं आहे. आपण वडिलांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते, असा खुलासा खुद्द ईशाने केला आहे.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया काय काम करतो? २७ व्या वर्षी ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

हेमा मालिनी यांची जीवनचरित्रात ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’मध्ये ईशाने लिहिलंय की ती वडील धर्मेंद्र यांचे भाऊ अजित देओल यांच्या खूप जवळ आहे. अजित हे अभय देओलचे वडील आहेत. २०१५ मध्ये अजित खूप आजारी पडले होते आणि तिला त्यांना भेटायचं होतं. धर्मेंद्र यांच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी सनी देओलने तिची अजित देओल यांच्याशी ओळख करून दिली होती, असं ईशाने म्हटलं आहे.

Video: सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करून परदेशात थाटला संसार, अभिनेत्रीने गृहप्रवेश करत दाखवली नव्या घराची झलक

ईशा म्हणाली, “मला माझ्या काकांना भेटायचं होते. त्याचं माझ्यावर आणि आहानावर खूप प्रेम होतं आणि आम्ही पण अभयच्या खूप जवळ होतो. त्यावेळी बाबांच्या घरी जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. ते रुग्णालयातही नव्हते, जेणेकरून आम्ही तिथे जाऊन भेटलो असतो. म्हणून मी सनीला फोन केला आणि त्याने आमची भेटण्याची व्यवस्था केली.”

ईशाने सांगितलं की जेव्हा ती तिचे काका अजित देओल यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या घरी गेली तेव्हा तिने प्रकाश कौर यांना पाहिलं आणि त्यांच्याकडे गेली. ती प्रकाश कौर यांना फार कमी काळासाठी भेटली होती. प्रकाश कौर तिला आशीर्वाद देऊन निघून गेल्या होत्या. ईशा म्हणाली, “मी त्यांच्या पायाला स्पर्श केला, त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या निघून गेल्या.”

पोलिसांचा मार खाल्ला आणि राजकारणाचा विचार सोडला, पंकज त्रिपाठींचा खुलासा; म्हणाले, “असं वाटत होतं की…”

धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरशी घटस्फोट न घेता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं होतं. धर्मेंद्र अजूनही त्यांच्या पहिल्या कुटुंबाजवळ राहतात आणि कधीकधी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींना भेटतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol mother prakash kaur reaction when esha deol met her at sunny deol home hrc