‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या चांगलाच चर्चेत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आलिया भट्ट व रणवीर सिंहबरोबर या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन सध्या चांगलाच गाजत आहे. या किसिंग सीनबाबत धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पैसे वाचविण्यासाठी ते…”, शत्रुघ्न सिन्हांच्या संघर्षाबद्दल मुलाचा खुलासा; म्हणाला, “बाबा यशस्वी झाल्यावर…

एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. सनी म्हणाला, “माझे वडील काहीही करू शकतात आणि मी म्हणतो की ते एकमेव अभिनेता आहेत जे हे करू शकतात. मी इतके चित्रपट पाहत नाही, मी माझे स्वतःचे चित्रपटही फारसे पाहत नाही. किसिंग सीनबाबत बोलताना सनी म्हणाला, “मी माझ्या वडिलांशी याबद्दल कसे बोलू? ते असे व्यक्ति आहे जे सर्व काही आपल्याजवळ ठेवू शकतात.”

हेही वाचा- माझे वडील मला…”चित्रपटसृष्टीमधील घराणेशाहीवर सनी देओलच वक्तव्य, म्हणाला…

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीनवर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणालेल्या “धरमजी आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजून पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं.”

हेही वाचा-“आताचे अभिनेते अंगावरचे केस…”, बॉलीवूडमधील बदलांविषयी सनी देओलने मांडले स्पष्ट मत; म्हणाला…

या चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर १० दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ७३.३३ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंत या चित्रपटाने १०५.०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.