बॉलीवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी ‘गदर २’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’चा सीक्वेल ‘गदर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर २’ येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. परंतु, याच दिवशी अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘OMG २’ चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन बिगबजेट चित्रपट आमनेसामने आल्यावर बॉक्स ऑफिसवर सनी देओल की अक्षय कुमार कोण बाजी मारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : “पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर…”, मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “संपूर्ण घाट…”

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
tharla tar mag adwait kala enters in the show to help sayali in mehendi ceremony
लबाड प्रियासाठी शेणाची मेहंदी; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ‘हे’ दोन नवीन पाहुणे! सायलीला करणार ‘अशी’ मदत, पाहा प्रोमो
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
zee marathi paaru and lakshmi niwas mahasangam new twist
लग्न, गैरसमज अन् कारस्थान…; ‘झी मराठी’च्या दोन मालिकांचा महासंगम! आठवडाभर काय घडणार? वाचा…
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ या दोन चित्रपटाच्या सारख्या रिलीज डेटबद्दल विचारले असता अभिनेता सनी देओल म्हणाला, “गदर चित्रपट (पहिला भाग) लगानबरोबर रिलीज झाला होता. तेव्हा गदरने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तर, दुसरीकडे लगानने खूपच कमी कमाई केली होती. त्यामुळे मला खरंच कळत नाही लोक आमच्या चित्रपटाची इतरांशी तुलना का करतात? चांगल्या चित्रपटांची इतरांशी तुलना केली जाऊ नये.”

हेही वाचा : तमन्ना भाटियाच्या व्हायरल गाण्यावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “तरुणांना लाजवाल…”

सनी देओल पुढे म्हणाला, “‘घायल’ आणि ‘दिल’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीही मला हाच अनुभव आला होता. दोन्ही चित्रपट वेगवेगळे होते तरीही काही लोक तुलना करतात. मला एवढेच सांगायचे आहे की, ज्या चित्रपटांची बरोबरी होऊ शकत नाही त्यांची तुलना नका करू…”

हेही वाचा : Video: “क्या खुदा ने मंदिर तोडा था, क्या राम ने…”, आशुतोष राणांचा धर्मांधांना कवितेतून परखड सवाल!

दरम्यान, यंदा ११ ऑगस्टला सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘OMG २ चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. ‘ओह माय गॉड २’ मध्ये अक्षय भगवान शिवशंकराच्या भूमिकेत दिसेल. तर, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader