अभिनेता सनी देओल नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सनीचा ‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान सनी देओल ने नुकतचं बॉलीवूडमधील नेपोटीजमवर (घराणेशाही) भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर

सनी देओल म्हणाला, ‘मला नेपोटीजमचा अर्थ नंतर समजला. पण माझ्या मनात या शब्दाबाबत अजूनही गोंधळ आहे. “जे लोक निराश आहेत त्यांनी घराणेशाही सारखी बाब पसरवली आहे. एखादे वडील आपल्या मुलांसाठी काही करत असेल तर ते या लोकांच्या लक्षात येत नाही. जर वडील आपल्या मुलासाठी काही करणार नाहीत तर कोण करणार? आणि हे फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळतं. तसेच नेपोटीजमबाबत लोक काय बोलतात याचीही मला कल्पना नाही. पण मी माझ्या मुलांच्या चित्रपटाला नेहमी पाठींबा देतो.”

नुकतच सनी देओलचा दुसरा मुलगा राजवीरने ‘दोनो’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सनीने या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या चित्रपटात राजवीरबरोबर अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमाची प्रमुख भूमिका आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केलेली नाही. सनीचा मोठा मुलगा करण देओलने २०१९ मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. स्वत: सनीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.३ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि अखेरीस तो फ्लॉप झाला होता.