अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान सनी देओल ने नुकतचं बॉलीवूडमधील नेपोटीजमवर (घराणेशाही) भाष्य केलं आहे.
घराणेशाहीबाबत बोलताना सनी देओल म्हणाला की, “जे लोक निराश आहेत त्यांनी घराणेशाही सारखी बाब पसरवली आहे. एखादे वडील आपल्या मुलांसाठी काही करत असेल तर ते या लोकांच्या लक्षात येत नाही. प्रत्येक कुटुंब आपल्या मुलासाठी काहीतरी करु इच्छित. यात चूकीचं काय आहे. पण यात तोच यशस्वी होतो जो स्वत:हून पुढे जातो.”
सनी देओल पुढे म्हणाला की, “माझे वडील मला अभिनेता बनवायला कधीच तयार नव्हते. मी माझ्या मुलांना अभिनेता बनवण्याचा अजिबात विचार करू शकत नाही. वडील प्रत्येक मुलाचे आदर्श असतात. मी देखील इंडस्ट्रीत माझा ठसा उमटवला आहे. मी पूर्णपणे माझ्या वडिलांसारखा नाही, पण थोडा थोडा मी त्यांच्यासारखाच आहे.”
सनी देओलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर’बरोबर अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट अधिक चांगली कामगिरी करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.