सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. त्या काळातही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ‘गदर २’च्या घवघवीत यशानंतर सनी देओलने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं वृत्त समोर आलं ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सनी देओलने आता त्याचं मानधन ५० कोटी इतकं वाढवलं असल्याची चर्चा आहे. सनीने अचानक हे मानधन वाढवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच सनी देओलने या बातम्या खऱ्या नसल्याचा खुलासा केला आहे. अद्याप त्याने त्याच्या मानधनात कोणताही बदल केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : कमर्शियल चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले “रामायण व महाभारत…”

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना सनी म्हणाला, “पैशांचे व्यवहार ही फार वैयक्तिक गोष्ट आहे. कुणीही आपल्या मिळकतीबद्दल उघडपणे कोणालाच सांगत नाहीत अगदी आपल्या जवळच्या लोकांनाही नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं मानधन हे मी चित्रपट स्वीकारल्यावर ठरवतो. त्यामुळे सध्या आम्ही ‘गदर २’ला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत आहोत.”

याविषयी सविस्तर माहिती देताना सनी म्हणाला, “मी किती पाण्यात आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. मी माझ्या पडत्या काळातही माझ्या मानधनाच्या बाबतीत तडजोड केलेली नाही आणि मी एक समजूतदार माणूस आहे, आज जरी लोकांना सनी देओलची एक वेगळी बाजू दिसत असली तरी आजही मी तोच जुना सनी आहे. माझ्यासाठी माझी सर्वात मोठी संपत्ती हे माझं कुटुंब आहे, आणखी काय हवं आपल्याला?”