काही दिवसांपूर्वीच करण जोहरचा कॉफी विथ करणचा आठव्या सीझनला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. आता दुसऱ्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावली आहे. दरम्यान करणच्या या चॅटशोमध्ये सनी आणि बॉबीने अनेक गुपिते उलगडली आहेत. दोघांनी करिअरबरोबर वैयक्तिक गोष्टींवरही दिलखुलास गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सनी देओलची पत्नी पूजा देओल लाईमलाईटपासून लांब का राहते? करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

दरम्यान या शोमध्ये सनीने अनेक कलाकारांबाबत वक्तव्य केलं आहे. रॅपिड फायर राउंडदरम्यान सनीने शाहरुख खान आणि अक्षय कुमारमधील एक चांगला आणि एक वाईट गुण सांगितला. शाहरुखबाबत बोलताना सनी म्हणाला, “शाहरुख खान मेहनती आहे, पण त्याने कलाकारांची ओळख एक वस्तू म्हणून बनवली आहे.” तर अक्षय कुमारबद्दल बोलताना सनी म्हणाला, मला अक्षयचे शिस्तबद्ध राहणे आवडते परंतु दरवर्षी मोठ्या प्रमाणात चित्रपट करणे योग्य नाही.”

हेही वाचा- धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर सनी, बॉबी देओलने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एवढंच नाही तर सनीने सलमान खानबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. सनी म्हणाला, “सलमान खानचं हदय खूप मोठं आहे. सलमानने अनेकदा मला त्याच्या घरी पार्टीला बोलवलं होतं. पण मी जाऊ शकलो नाही. पण ‘गदर २’ च्या यशानंतर आयोजित केलेल्या पार्टीत माझ्या एका निमंत्रणावर तो आला होता.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol reveals what he doesnt like about shah rukh and akshay in koffee with karan 8 dpj