‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गेल्याच महिन्यात याचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांचा याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला आहे.

चित्रपटाचा पहिला भाग भारत-पाकिस्तान फाळणीवर बेतलेला होता, तर याचा सीक्वल हा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर बेतलेला असेल असं टीझरवरुन स्पष्ट झालं आहे. जेव्हा ‘गदर – एक प्रेम कथा’ प्रदर्शित होणार होता तेव्हा बॉलिवूडमधील बरेच लोक या चित्रपटाच्या विरोधात होते असं खुद्द सनी देओलने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं होतं.

bangladesh ban hilsa export
भारत-बांगलादेश संबंध बिघडणार? बांगलादेशने दुर्गा पूजेआधी थांबवली हिलसा माशांची भारतातील निर्यात; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sexual harrassement woman arm force officers
भारतीय वायूदलातील विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप : भारताच्या सशस्त्र दलांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ?
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
Ravichandran Ashwin on Rohit Sharmas captaincy
Team India : कर्णधारपदाच्या बाबतीत रोहित शर्मा विराट आणि धोनीपेक्षा कसा आहे वेगळा? अश्विनने सांगितले कारण
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
ABT chief Jashimuddin Rahmani
भारताविरुद्ध कट रचणार्‍या अल कायदाच्या समर्थकाची बांगलादेशने केली सुटका; कोण आहे जशिमुद्दीन रहमानी?
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’

आणखी वाचा : जेव्हा पत्नीला न सांगता अजय देवगणने दिलेला किसिंग सीन; ‘ही’ होती काजोलची प्रतिक्रिया

मध्यंतरी सनी देओलने कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली त्यावेळी त्याने पहिल्या भागावेळच्या आठवणींना उजाळा दिला. सनी देओल म्हणाला, “जेव्हा ‘गदर – एक प्रेम कथा’ प्रदर्शित झाला तेव्हा लोक त्यावर एवढं भरभरून प्रेम करतील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनी याकडे एक पंजाबी चित्रपट कानाडोळा केला, हिंदीत डब करायची मागणी केली. बऱ्याच चित्रपट वितरकांनी तो विकत घेण्यासही नकार दिला, पण लोकांना चित्रपट प्रचंड आवडला त्यांनी तो डोक्यावर घेतला आणि इतरांची तोंडं बंद केली. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच आज आम्ही याचा पुढील भाग सादर करू शकलो.”

पहिल्या भागाप्रमाणेच या ‘गदर २’साठी सुद्धा प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत. दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २२ वर्षांपूर्वी रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नाही ते येणारा काळच ठरवेल.