अभिनेता सनी देओल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही. पण ‘गदर २’ च्या यशानंतर त्याने अनेक मुलाखती दिल्या, ज्यात त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी, किस्से शेअर केले. जून महिन्यात सनीचा मुलगा करणचं लग्न झालं. या लग्नातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. आता सनीने मुलाच्या लग्नात त्याच्या घरात व्हिडीओ काढणाऱ्या एका नातेवाईकाला आपण ओरडलो होतो, असा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

अनेकदा सोशल मीडियावर टीका करणाऱ्या सनीने नुकतीच ‘आप की अदालत’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने मुलगा करणच्या लग्नाबद्दल सांगितलं. सनी म्हणाला की तो त्याच्या काही नातेवाईकांमुळे खूप नाराज आहे, जे त्यांच्या घरी थांबले होते आणि सोशल मीडियावर कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत होते. “मी माझ्या काही नातेवाईकांवर खूप नाराज होतो. घरात सुरू असलेल्या कार्यक्रमांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या काहींना फटकारले. “तुम्हाला लाज नाही वाटत का?” असं मी त्यांना म्हणालो.

‘जवान’ची दमदार कमाई, पाच दिवसांत गाठला ३०० कोटींचा टप्पा; पण मोडता आला नाही ‘गदर २’ चा ‘हा’ रेकॉर्ड

सनीला हे बघून राग आला होता, नंतर त्याला कळालं की लग्नासाठी आलेला प्रत्येकजण व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे आणि सर्वांना थांबवणं शक्य नाही. “जेव्हा घरात लग्नाचे विधी सुरू होते, तेव्हा मी पाहिलं की सर्वजण व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. त्यामुळे मग दिवसाच्या शेवटी मी म्हणालो, ‘असू द्या, मी याबद्दल काहीही करू शकत नाही’,” असं सनीने सांगितलं.

सनी सोशल मीडियाबद्दल म्हणाला, “सोशल मीडिया आल्यापासून, सर्व बेरोजगार लोकांच्या हातात एक साधन आले आहे, ते सर्व खोट्या आयडीवरून त्यांना हवे ते बोलू शकतात. ते लोकांना कसे त्रास देतात याचा विचार करत नाहीत, ते फक्त स्वतःबद्दल विचार करतात.”