बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा गदर २ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सनी देओलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेत्री व त्याची सावत्र आई हेमा मालिनी यांनी पाहिला. तसेच त्यांनी सनीच्या अभिनयाचं कौतुकही केलं.

हेमा मालिनींनी पाहिला सावत्र मुलाचा ‘गदर २’ चित्रपट, सनी देओलचा उल्लेख करत म्हणाल्या…

हेमा मालिनी यांनी सनीचं कौतुक केलं, त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हेमा थिएटरमधून बाहेर पडतानाचा फोटो रिपोस्ट केला आहे. खरं तर, ती मूळ पोस्ट झी स्टुडिओने शेअर केली होती. “जेव्हा हिंदुस्थानच्या ड्रीम गर्लने पाहिली हिंदुस्थानच्या मुलाची कहाणी” असं कॅप्शन त्यांनी दिलं होतं. हीच स्टोरी सनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केली आहे.

sunny deol story on hema malini
सनी देओलची स्टोरी

‘गदर २’ पाहिल्यानंतर काय म्हणाल्या होत्या हेमा मालिनी?

“गदर २ पाहून आले आहे. खूप छान वाटलं. चित्रपट माझ्या अपेक्षेप्रमाणेच अतिशय मनोरंजक होता. ७० आणि ८० च्या दशकातील काळ दाखविण्यात आला आहे. अनिल शर्मा यांनी खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे. सनीने खूप चांगलं काम केलंय. उत्कर्ष शर्मानेही खूप चांगला अभिनय केला आहे,” असं हेमा मालिनी हा चित्रपट पाहून आल्यावर म्हणाल्या.