ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगा सनी देओलने फोटो शेअर केले आहे. सनीने आईबरोबरचे दोन फोटो शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

सनी देओलने आई प्रकाश कौर यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. गदर २ फेम अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर आईसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सनी आपल्या आईला मिठी मारून आईच्या डोक्याचे प्रेमाने चुंबन घेताना दिसत आहे. “हॅपी बर्थडे आई लव्ह यू,” असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.

सनी देओलच्या या पोस्टवर त्याचा मुलगा करणने कमेंट करत आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर धर्मेंद्र यांनीही सनीच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या पहिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,’ अशी कमेंट धर्मेंद्र यांनी केली आहे.

dharmendra comment
करण देओल व धर्मेंद्र यांच्या कमेंट्स

सनीच्या या पोस्टवर चाहतेही कमेंट्स करून प्रकाश कौर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, प्रकाश कौर व धर्मेंद्र यांचं लग्न कमी वयातच झालं होतं. त्यांना सनी, बॉबी, अजिता व विजेता अशी चार अपत्ये आहेत. धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न हेमा मालिनींशी केलं होतं, त्यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत.

Story img Loader