‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन दशकांनंतर तारा सिंग व सकीनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमीषा पटेलला ट्रोल करण्यात आलं होतं, त्याबाबत सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने सोशल मीडिया कल्चरबद्दल भाष्य केलं. चित्रपटाबद्दल स्पॉयलर दिल्याने काही दिवसांपूर्वी अमीषा ट्रोल झाली होती. यावर आता सनीने प्रतिक्रिया दिली आहे. सनी म्हणाला, “सोशल मीडियावर जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे काम नाही, त्यांच्या हातात एक खेळणं आलं आहे, तिथे ते काहीही लिहितात. ते काय लिहितात, याचंही त्यांना भान नसतं. कारण त्यामुळे त्यांना काहीच अडचण येत नाहीये.”
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
सनी पुढे म्हणाला, “कमेंट्स वाचू नका आणि ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा. आजकाल लोक परदेशी संस्कृतीने प्रभावित होत आहेत. ते समजून न घेता परदेशी संस्कृतीचं अनुकरण करत आहेत.” दरम्यान, ‘गदर २’ मधील अभिनेत्री सिमरत कौरला देखील एका चित्रपटात इंटिमेट सीन दिल्याने ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर तिने ट्रोल्सना खडे बोल सुनावले होते.
‘गदर २’ मध्ये सनी देओल, अमीषा पटेल, सिमरत कौर आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा व सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हादेखील आहे.