बॉलीवूड अभिनेता सनी देओल लवकरच सासरा होणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल याने द्रिशा आचार्यबरोबर साखरपुडा केला असून आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, दोघांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लग्नाची तयारी आणि चर्चांदरम्यान, करण आणि द्रिशा डिनर डेटवर गेल्याचे दिसले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा- चित्रपटांमधील भूमिकेबाबत नवाजुद्दिन सिद्दिकीची मोठी घोषणा; म्हणाला, “आता फक्त…”
करण देओल आणि द्रिशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही बुधवारी लंच डेटवर स्पॉट झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. द्रिशाने ब्लॅक टॉप आणि ब्लू डेनिम जीन्स, तर करण ब्लॅक टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये होता. या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. द्रिशाच्या स्टाईलचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.
हेही वाचा- “दूध पिताना ती…”; आलिया भट्टने सांगितली लाडकी लेक राहाची ‘ती’ सवय, म्हणाली, “आमच्या दोघींमध्ये…”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण आणि द्रिशा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू आहे. १६ ते १८ जून या कालावधीत मुंबईत हे दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. द्रिशा आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही, त्यामुळे या लग्नाची चर्चा न करण्याचा देओल कुटुंबाने निर्णय घेतला आहे. द्रिशा चित्रपटात काम करत नसली तरी ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते.