बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण याच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आज करण द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करण देओलने त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत करण आणि द्रिशा वधू-वरांच्या जोडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. लग्नाच्या वेळी द्रिशाने लाल रंगाच्या लेहंगा घातला आहे. तर करणने क्रीम रंगाची शेरवानी आणि त्याला जुळणारी पगडी घातली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून करणच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. धर्मेंद्र यांच्यासह सनी देओलही लेकाच्या लग्नाचा आनंद घेत आहेत. त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये करण घोड्यावरुन लग्नमंडपात जाताना दिसले होते. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र, सनी तसेच देओल कुटुंबियांनी वरातीचा आनंद घेतला. या वरातीमध्ये धर्मेंद्रही आनंदाने नाचताना दिसत आहेत. तसेच वरातीतील मंडळींच्या पारंपरिक लूकनेही लक्ष वेधलं आहे.
धर्मेंद्र त्यांच्या नातवाच्या वरातीमध्ये आनंदाने नाचत आहेत पाहून चाहतेही त्यांचं कौतुक करत आहेत. लेकाच्या वरातीत सनी देओलचा स्वॅग पाहून त्याच्या लूकचं कौतुक होत आहे. तर बॉबी देओलनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने सनी लेकाचं लग्न करत आहे हे पाहून नेटकरी देओल कुटुंबियांचं कौतुक करत आहेत.