सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘गदर २’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. सनी देओल व अमीषा पटेलचा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यापासून तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा रेकॉर्डही मोडला आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवसात ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा व्यवसाय केला. ‘गदर २’ चे शो हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तिसऱ्या दिवशी गदर २ ने ५० कोटींचा गल्ला जमवला अन् अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १३३.१८ कोटींची कमाई करत एक वेगळा रेकॉर्ड बनवला आहे. यानंतर आलेल्या लॉन्ग वीकेंडमुळे तर चित्रपटाच्या कमाईत आणखीनच भर पडल्याचं स्पष्ट झालं आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनानिमित्त या ‘गदर २’साठी लोकांनी बॉक्स ऑफिसवर अधिक गर्दी केल्याचं चित्र दिसलं.

Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

आणखी वाचा : कोण आहेत सध्याचे सर्वाधिक मानधन घेणारे चित्रपट लेखक? ८१ व्या वर्षीसुद्धा घेतात ‘इतके’ कोटी

‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार ‘गदर २’ने १५ ऑगस्टला ५५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘गदर २’च्या कामईतला आजवरचा हा एका दिवसाचा सर्वाधिक आकडा आहे. पाचही दिवसांत ‘गदर २’ने २२९ कोटींच्या आसपास कमाई भारतात केली आहे. लवकरच हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’चा अन् शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्माचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनिल शर्मा यांनी पुन्हा उत्कर्षला चित्रपटांमध्ये नाव कामावण्याची संधी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ७६.६५ कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती.