बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तिसरा आठवडा संपण्यापूर्वीच याने जवळपास ४७० कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण देशभरात या चित्रपटाची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर याचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

‘गदर २’ची संपूर्ण टीम या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याच्या अर्जावर काम करत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितलं की लोक त्यांना फोन करून हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची मागणी करत आहेत. ते म्हणाले, “आम्ही सगळेच यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘गदर २’ला ऑस्करसाठी पाठवायला हवं, या चित्रपटात ती ताकद आहे. पहिल्या भागाप्रमाणेच ‘गदर २’ची कथादेखील एका वेगळ्याच पद्धतीने मांडली आहे आणि ही ओरिजीनल कहाणी आहे.”

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य

आणखी वाचा : सनी देओलने काढलेली एका मुलीची छेड अन् तिच्या भावाने केला सनीच्या घरापर्यंत पाठलाग; पुढे काय घडलं? जाणून घ्या

याच मुलाखतीमध्ये अनिल शर्मा यांनी आणखी एक खंत व्यक्त केली. गेली ४० वर्षं या इंडस्ट्रीमध्ये काम करूनसुद्धा त्यांना किंवा त्यांच्या चित्रपटाला म्हणावा तसा सन्मान किंवा पुरस्कार मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर आपण या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत असंदेखील अनिल शर्मा यांना वाटत नसल्याचं त्यांनी कबूल केलं.

एकूणच ‘गदर २’ला मिळणारा प्रतिसाद पाहून अनिल शर्मा खुश आहेत. ‘गदर २’ हा २००१ साली आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सीक्वल आहे. २००१ प्रमाणेच या दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. लवकरच ‘गदर २’ हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करून शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.