सनी देओलचा गदर २ चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने बॉक्स ऑफिसवर गर्दी करत आहेत. तर काही लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार हे निश्चित आहे.
मीडिया रीपोर्टनुसार ‘गदर २’च्या ओटीटी रिलीजसाठी लोकांना वाट बघायला लागणार हे स्पष्ट झालं आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली असून आता त्याची घोडदौड ४०० कोटींच्या टप्प्याकडे सुरू आहे. एकूणच प्रेक्षकांमधला उत्साह पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच ठाण मांडून बसणार हे अगदीच स्पष्ट आहे.
आणखी वाचा : ‘पठाण’ व ‘बाहुबली’ला मागे टाकत ‘गदर २’ने रचला नवा विक्रम; दुसऱ्या वीकेंडला कमावले ‘इतके’ कोटी
यामुळेच चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मीडिया रीपोर्टनुसार ‘गदर २’ साधारण दिवाळीच्या सुमारास ओटीटीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चार आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो पण ‘गदर २’च्या बाबतीत असं होणार नाही हे स्पष्ट आहे.
सनी देओलचा हा चित्रपट ओटीटीवर यायला आणखी दोन महीने लागतील असंच चित्र सध्या दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसागणिक या चित्रपटासाठी अधिकच गर्दी होताना दिसत आहे. नुकताच दुसऱ्या वीकेंडलाही या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करत ‘पठाण’ आणि ‘बाहुबली’ या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडीत काढले आहेत. त्यामुळे ‘गदर २’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतक्यात येणार नाही हे स्पष्ट आहे.