ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं, प्रकाश यांच्यापासून त्यांना चार अपत्ये आहेत. सनी देओल, बॉबी देओल ही दोन्ही मुलं, जी धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत आली. त्यांना अजेता व विजेता नावाच्या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी केलं, त्यांना इशा व अहाना देओल नावाच्या मुली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

खरं तर धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण आता हे सांगण्याचं कारण म्हणजे धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नींच्या मुलांचं एकमेकांशी असलेलं नातं होय. खासकरून सनी व बॉबी यांचं सावत्र आई हेमा मालिनी व त्यांच्या मुली इशा व अहानाशी कसं नातं आहे, याची कायम चर्चा होत असते. सनी देओलचा मुलगा करणचं जुन महिन्यात लग्न झालं. त्या लग्नाला हेमा मालिनी व त्यांच्या दोन्ही मुली गैरहजर होत्या.

नंतर ऑगस्ट महिन्यात सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, तो सिनेमा पाहायला हेमा मालिनी गेल्या होत्या. तसेच इशाने सावत्र भाऊ सनीच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंगही ठेवलं होतं. तिथे बॉबी व सनीने हजेरी लावली होती आणि त्या चारही भावंडांचे फोटो व व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. आता ‘कॉफी विथ करण’च्या ८ व्या पर्वात सनी व बॉबीने हजेरी लावली. यावेळी त्यांना सावत्र बहिणींशी असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सनी काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

इशा आणि अहाना देओलशी असलेल्या नात्याबद्दल सनी म्हणाला, “त्या दोघी माझ्या बहिणी आहेत. जे आहे ते सत्य आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. इशाने माझ्या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवल्याचा मला खूप आनंद झाला होता. या सगळ्यामध्ये घडलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हा चित्रपट यशस्वी झाला.” दरम्यान, संपूर्ण देओल कुटुंबाने एकत्र येत ‘गदर २’ च्या यशाचं सेलिब्रेशन केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol talks about relation with stepmom hema malini daughter esha ahana deol hrc