गदर २ चित्रपटामुळे अभिनेता सनी देओल सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होतं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सनी देओलने त्या कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडेल याबाबचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘गदर’साठी सनी देओल नव्हे तर गोविंदा होता दिग्दर्शकाची पसंती? अनिल शर्मा यांनी सांगितलं नेमकं सत्य
सनी देओलने नुकताच झूमशी संवाद साधला. या मुलाखतीत सनीला विचारण्यात आले की त्याला कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर देत सनी म्हणाला, “मला आलिया भट्टबरोबर काम करायला आवडेल. , आलियाच्या विरोधात कोणतीही भूमिका असावी असे नाही. मला आलिया आवडते. चित्रपट करणे खूप मनोरंजक असेल. मी असे म्हणत नाही की विरुद्ध भूमिका नायक-नायिकेसारख्या असाव्यात, मी म्हणतोय की कोणत्याही प्रकारच्या भूमिका चालतील. अगदी वडील आणि मुलीची भूमिका असेल तरीही मी करायला तयार आहे.”
हेही वाचा- “मला वाटतं होत की…” सावत्र बहीण ईशा देओलबरोबरच्या नात्यावर सनी देओलचे भाष्य, म्हणाला…
आलियाबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात आलियाबरोबर अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. तसेच नुकतच आलियाला आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ६९ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आलियाला हा पुरस्कार मिळाला आहे.
गदर २ च्या कमाईबाबत बोलायचं झालं तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४५० कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच कमाईत अनेक रेकॉर्डही मोडले आहेतय अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. कमाईच्याबाबतीत या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाणलाही मागे टाकलं आहे.