बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नात फोन आणण्यास बंदी का होती, याचा खुलासा विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशलने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अभिनेता?

सनी कौशलने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याने विकी आणि कतरिनाच्या लग्नात फोन आणण्यास का बंदी होती, याचे कारण सांगताना, सनीने म्हटले, “हा फक्त गोपनियतेचा प्रश्न नव्हता, तर जमलेल्या सर्वांचा आनंददेखील महत्वाचा होता. तिथे असलेले सर्वजण त्या क्षणाचा आनंद घेत होते. त्यामुळे कोणत्याही पाहुण्याला फोनची गरज पडली नाही. सर्वांनी विकी आणि कतरिनाच्या लग्नात मजा केली.” पुढे बोलताना त्याने म्हटले आहे की, माझे मित्र, नातेवाईक आणि कतरिनाचे नातेवाईक या सगळ्यांमध्ये घट्ट नाते तयार झाले आहे. आम्ही सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप मजा केली. एकमेकांबरोबर वेळ घालवताना तीन दिवस कसे गेले, याची जाणीवदेखील झाली नाही. इतरांपासून काहीतरी लपवण्याची किंवा काहीतरी दाखवण्याचे कोणतेही दडपण नव्हते. कोणत्याही दडपणाखाली लग्न होत नाही.”असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! दोघींनाही अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

कतरिना आणि विकी हे लोकप्रिय जोडपे असून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चा रंगलेली दिसते. गेल्या काही दिवसांपासून विकीच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामुळे हे जोडपे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ या जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले होते, त्यावेळी त्याचा डान्स पाहून चाहत्यांनी विकीला घरातच चांगला शिक्षक मिळाल्याचे म्हटले होते. तर काहींनी विकीचा हा डान्स पाहून कतरिनाच्या डान्सची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर विकी कौशलने जेव्हा कतरिनाने त्याचे या डान्ससाठी कौतुक केले, त्यावेळी ऑस्कर मिळाल्याचे म्हटले होते. याबरोबरच, या गाण्यातील त्याचा डान्स पाहण्याआधी कतरिना त्याला वरातीत डान्स करणारा समजत होती, कारण तो प्रशिक्षित डान्सर नाही. मात्र हे गाणे पाहिल्यानंतर तिचा विचार बदलला असेल, असेही त्याने म्हटले होते.

दरम्यान, विकी आणि कतरिनाने ९ डिसेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली आहे. विकी-कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. कतरिना कैफ ‘टायगर व्हर्सेस पठाण’ चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे. तर सनी कौशल हा लवकरच ‘फिर आयी हसीन दिसरुबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny kaushal reveals reason behind no phone policy in katrina kaif and vicky kaushal wedding nsp