बॉलिवूड अभिनेत्री ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही ना काही कारणांमुळे सनी चर्चेत असते. नुकतंच सनी लिओनी गुरुवारी बनारसमध्ये आल्याचं स्पष्ट झालं. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस कपाळावर त्रिपुंड अशा धार्मिक पेहरावात बनारसच्या घाटावर सनीने पूर्ण भक्तिभावाने गंगेची पूजा केली. याआधी तिने बाबा विश्वनाथाचे दर्शन घेऊन पूजा केली होती. सनी लिओनीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांणी घाटावर चांगलीच गर्दी केली.

पोलिसांनी मोठ्या कष्टाने ही परिस्थिती हाताळावी लागली. प्रथमच बनारसला भेट देणारी सनी माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांच्यासह संध्याकाळी उशिरा दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या गंगा आरतीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी वैदिक पद्धतीने गंगा मातेची पूजा केली. ही भव्य आरती पाहून सनी अगदीच मंत्रमुग्ध झाली. गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा, कोषाध्यक्ष आशिष तिवारी, सचिव सुरजीत सिंह, यांनी सनीला पोषाख स्मृतिचिन्ह आणि प्रसाद दिला.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
May or may not be true Yuzvendra Chahal drops cryptic insta story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘हे खरं पण…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्र चहलने सोडले मौन, इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

आणखी वाचा : मराठा मंदिरचे मालक मनोज देसाई यांनी ‘टायगर ३’बद्दल व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “माझ्या फार…”

जगतगंज येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना सनी लिओनीने पत्रकारांशी व उपस्थित असलेल्या मीडियाशी संवाद साधला. दरम्यान बनारससारख्या शहराला भेट दिल्याचा फार आनंद झाल्याचा खुलासाही सनीने केला आहे. याबरोबरच सनीने धार्मिक चित्रपटातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘जागरण मीडिया’च्या वृत्तानुसार मीडियाशी संवाद साधताना सनी म्हणाली, “संधी मिळाली तर मला धार्मिक चित्रपटांतही काम करायला आवडेल. परंतु असे चित्रपट फार विचारपूर्वक करावे लागतात.” असं सनीचं म्हणणं आहे. याबरोबरच सनी आगामी भारत-ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी उत्सुक असल्याचंही नमूद केलं. सनीने यासाठी संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छाही दिल्या.

Story img Loader