बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. उत्तम डान्सर असलेली सनी लिओनी नुकतीच मराठी गाण्यावर थिरकली होती. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
हृता दुर्गुळे अभिनीत ‘कन्नी’ या मराठी चित्रपटातील ‘नवरोबा नवरोबा’ गाण्यावर सनी हटके डान्स मूव्हज करताना पाहायला मिळतेय. क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट असा को-ऑर्ड सेट तिने या गाण्यासाठी परिधान केला आहे. निळ्या रंगाच्या बूट्स आणि मॅचिंग हॅटची निवड करीत सनीने हा लूक पूर्ण केला आहे. या डान्समार्फत सनीने ‘कन्नी’ चित्रपटाचा निर्माता आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत सनीने लिहिले, “सनी रजनी तुला आणि ‘कन्नी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!”
सनीच्या व्हायरल झालेल्या या मराठमोळ्या गाण्यावर चाहत्यांबरोबरच चित्रपटातील कलाकारांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. “माझं गाणं इतकं खास केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार” अशी कमेंट अभिनेता अजिंक्य राऊतने केली. तर “सनी टेलर स्विफ्टपेक्षाही चांगली नाचते”, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा… ‘या’ कारणामुळे करण जोहर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात होता गैरहजर; जामनगरला निघण्याआधीच…
दरम्यान, हृता दुर्गुळे अभिनीत ‘कन्नी’ चित्रपट महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व रिशी मनोहर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.