Sunny Leone Pooja With Children : अभिनेत्री सनी लिओनीने २०१२ मध्ये आलेल्या ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पुढे तिने ‘रागिणी एमएमएस २’सारख्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवले. ‘स्पिल्ट्सव्हिला’सारख्या शोचे सूत्रसंचालन करणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या संसारात रमली आहे. सनी नेहमी तिचा पती, दोन मुलं व एका लेकीबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसते. सनी आपल्या सुखी संसाराचे विशेषतः तिच्या मुलांबरोबरचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करीत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ती त्यात तिचा नवरा डॅनियल वेबर आणि मुलांबरोबर पूजा करताना दिसत आहे.

हेही वाचा…‘बिग बॉस’फेम सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात लेकीच्या जन्मानंतर दुरावा? एकमेकांवर करतायत टीका; अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सनी या व्हिडीओत तिच्या कुटुंबीयांसह एका नव्या वास्तूत दिसत आहे. तेथे तिच्यासमोर एक पूजा मांडलेली दिसत आहे. याच व्हिडीओत एक पूजा सांगणारे भटजीसुद्धा असून, ते जसजसे मंत्रांचा उच्चार करतात, त्याप्रमाणे सनीही त्यांच्यामागोमाग मंत्र म्हणते. हे मंत्र म्हणत असताना सनी तिच्या तिन्ही मुलांना या मंत्रांचे उच्चार करायला सांगते. सनीचा पतीही पूजेतील मंत्रांचा उच्चार करताना दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सनी लिओनी नव्या वास्तूची पूजा करत आहे, असे दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चेत हे सनीच नवे ऑफिस आहे, असे बोलले जात आहे. या नव्या वास्तूमध्ये सनी कपाळाला गंध लावून, डोक्यावर ओढणी घेत, मनोभावे पूजा करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओवर सनीचे चाहते तिचे नव्या वास्तूबद्दल अभिनंदन करीत आहेत. तर काही नेटकरी तीच कौतुक करत आहेत.

सनी लिओनीच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे सुंदर कुटुंब असून सनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे वाढवत आहेत”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे पाहून खूप आनंद झाला तुमची संस्कृती जपणं नेहमी चांगलं असत”, तर आणखी एका नेटीझनने लिहिलं, “ती कुठून आली या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही, ती तिच्या मुलांना तिच्या संस्कृतीतील गोष्टी शिकवत असून त्यासाठी तीच कौतुक करायला हवं.”

हेही वाचा…विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”

सनी ऑगस्ट २०२४ मध्ये आलेल्या ‘कोटेशन गँग’ सिनेमात दिसली होती. त्यात तिच्याबरोबरच जॅकी श्रॉफ आणि प्रियामणी मुख्य भूमिकांत होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone did pooja with family for new property psg