अभिनेत्री सनी लिओनी ही बी-टाऊनमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या दिलखुलास आणि नम्र स्वभावाने नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. कधी मुलांसोबत तर कधी पती डॅनियलसोबत ती सार्वजनिक ठिकाणी दिसते. प्रत्येकवेळी ती फोटोग्राफर्सना कसलीही चिडचिड न करता फोटो देते. आता नुकतंच तिला विमानतळावर पाहण्यात आलं, तेव्हाचा तिचा व्हिडीओ खूप व्हायरल होता आहे.
सनी पापाराझींचीमध्ये आवडती आहे. तिच्या हसत्या खेळत्या स्वभावामुळे फोटोग्राफर्सही तिचे फोटो काढण्यासाठी नेहमी सज्ज असतात. तिही मोकळेपणाने संवाद साधते. आता नुकतीच ती विमानतळावर दिसली. तिथला एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. “आता परत मी तुम्हाला बघणार नाही,” या तिच्या बोलण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : रणबीर कपूरला सतावते भविष्याची काळजी, लेकीचा उल्लेख करत म्हणाला, “ती २० वर्षांची होईल तेव्हा मी…”
जेव्हा सनी विमानतळावर पोहोचली तेव्हा तिथे आधीच उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. पण सनी समोर असलेल्या कॅमेर्याकडे अजिबात पाहत नव्हती. म्हणून कॅमेरामन म्हणाला, ‘मॅडम तुम्ही इकडे बघतच नाहीत. फोटोग्राफरचं हे बोलणं ऐकताच सनीने आधी खूप प्रेमाने पोज दिली आणि मग क्यूट अंदाजात म्हणाली, “आता मी तुमच्याकडे बघणार नाही. तुम्ही = माझी चेष्टा करता.” हे बोलून सनी हसू लागते आणि तिथे उपस्थित लोकही हसू लागतात.
हेही वाचा : “आई झाल्यावर आपल्यावर…”; सनी लिओनीने शेअर केला पालकत्वाचा अनुभव
दरम्यान सनी सध्या ‘स्प्लिट्सविला १४’ मध्ये दिसत आहे. हा शो ती आणि अर्जुन बिजलानी मिळून होस्ट करत आहेत. सध्या सनी रिअॅलिटी शोमध्येच जास्त दिसत आहे. बॉलिवूडमध्ये ती क्वचितच पाहायला मिळते. सनी पुढच्या वर्षी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.