बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सनीने तिच्या या पोस्टमध्ये एक ९ वर्षाची लहान मुलगी बेपत्ता झाल्याचे स्पष्ट सांगितले होते. ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सनी फार अस्वस्थ असल्याचं तिच्या या पोस्टवरुन स्पष्ट होत होतं. इतकंच नव्हे तर जी कुणी व्यक्ती त्या मुलीला शोधून काढेल तिला सनी खास बक्षीससुद्धा देणार होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनीने या पोस्टमध्ये जाहीर केलं होतं की या मुलीला शोधून आणणाऱ्याला ५०००० रुपये रोख देण्यात येतील. सनीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. या पोस्टमध्ये सनीने मुंबई पोलिसांनासुद्धा टॅग केलं होतं. अनुष्का किरण मोरे असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव होते व ती मुलगी सनीच्या मुंबईच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेचे मुलगी होती. आता ती मुलगी सुखरूप आपल्या पालकांकडे परतल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : ९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधून आणणाऱ्याला सनी लिओनी देणार ५०,००० रुपये; चिमूरडीशी अभिनेत्रीचा नेमका संबंध काय?

खुद्द सनीनेच याबद्दल आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. सनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “आपल्या प्रार्थनांना अखेर यश मिळालं. ही सगळी परमेश्वराचीच कृपा. त्या चिमुरडीच्या संपूर्ण कुटुंबाकडून मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक आभार. आमची अनुष्का २४ तासांनी पुन्हा आपल्या घरी परतली आहे. माझ्या हितचिंतकांचे, चाहत्यांचे मनापासून आभार. तुम्ही ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केलीत त्यामुळेच हे शक्य झाले आहे, तुमचे खूप खूप आभार.”

जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून अनुष्का बेपत्ता होती. सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या पोस्टवर अभिनेत्रीचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सनीच्या चाहत्यांनी या पोस्टवर अनुष्काच्या परतण्याने त्यांनाही फार आनंद झाल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर सनीच्या चाहत्यांनी तिच्या या संवेदनशील स्वभावाचे व औदार्याचे प्रचंड कौतुकही केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone house helps missing daughter returned to her home safely avn