पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्धी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. सनी लिओनी सध्या एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच ती काम करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. त्यात तिच्या पायाला दुखापत झाली आहे. याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
सनी लिओनी ही सध्या ओ माय घोस्ट या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामुळे ती सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच सनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सनीच्या पायला दुखापत झाली आहे. त्यात तिने पायाच्या अंगठ्याला लागल्याचे दाखवलं आहे. त्यातून घळाघळा रक्त वाहताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘पतली कमरिया’वर सनी लिओनीने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
तिला झालेली दुखापत जास्त गंभीर नसली तरी यामुळे तिला वेदना होत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिची टीम ही तिला दुखापत झालेल्या ठिकाणी प्राथमिक उपचार करताना दिसत आहे. त्याबरोबर तिची चौकशीही करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सनीने तीन इमोजी शेअर केले आहेत.
सध्या सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्याबद्दलची काळजी व्यक्त केली आहे. इतक्या सुंदर मुलींनाही इजा कशी काय होऊ शकते? अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने इतकंस तर लागलं आहे, इतकी कशाला रडतेस… आम्ही स्वयंपाकघरात काम करताना यापेक्षा जास्त लागतं, असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “माझी एवढीच इच्छा…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले थेट वक्तव्य
दरम्यान सनी लिओनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. कॅनडामध्ये जन्मलेली सनी लिओनी मूळची भारतीय आहे. तिने २०११ साली डॅनिअल वेबरशी लग्न केलं होतं.