बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सनीने तिच्या या पोस्टमध्ये एक ९ वर्षाची लहान मुलगी बेपत्ता झाल्याचे तिने स्पष्ट केलं आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सनी फार अस्वस्थ झाल्याने तिने ही पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टच्या माध्यमातून सनी इतरांची मदत घेऊ पहात आहे. या चिमूरडीशी सनीचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?

अनुष्का किरण मोरे असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. या मुलीचे वय ९ वर्षे असून जो तिला सुखरूप घरी आणेल त्याला सनी लिओनी विशेष बक्षीस देणार आहे. आता सनीने या मुलीच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ही लहान मुलगी अनुष्का कोण आहे आणि तिचे सनीशी काय नाते आहे? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे, ज्याचे उत्तरही सनीने याच पोस्टमध्ये दिले आहे. अनुष्का ही सनीच्या मुंबईच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेचे मुलगी असल्याचे सनीनेच सांगितले आहे.

आणखी वाचा : The Archies Trailer: मैत्री, रोमान्स व बॉलिवूड स्टारकिड्सचा हटके अंदाज; बहुचर्चित ‘द आर्चीज’चा ट्रेलर प्रदर्शित

सनीने नुकताच या मुलीचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर तिचे नाव, पालकांची माहिती, घरचा पत्ता आणि फोननंबर अशी सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर करताना सनी लिहिते की, “या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत आणण्यासाठी मी वैयक्तिकरित्या आणखी ५०००० रुपये देईन.” त्यानंतर अभिनेत्रीने मुंबई पोलिस आणि महिला मंगल यांनाही या पोस्टमध्ये टॅग केले.

सनी पुढे म्हणते “ही माझ्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासूनती बेपत्ता आहे, ती ९ वर्षांची आहे, तिचे आईवडील तिला शोधत आहेत, कृपया सरिता तिच्या आईशी संपर्क साधा : + 91 88506 05632 किरण वडील: +91 82376 31360 किंवा थेट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल.”

सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या पोस्टवर अभिनेत्रीचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता, अनुष्का लवकरच तिच्या पालकांकडे परतेल असे वाटत आहे. सनीच्या चाहत्यांनी तिच्या या संवेदनशील स्वभावाचे व औदार्याचे प्रचंड कौतुक केले आहे.

Story img Loader