“कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला…” म्हणत साधारण ३१ वर्षांपूर्वी त्याने चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली अन् छोटा पडदा गाजवणाऱ्या फौजीने अख्ख्या बॉलीवूडला मोठ्या ठसक्यात ‘मैं हूँ ना’ सांगितलं. ‘रावन-जीवन’च्या लढाईत तो भलेही फ्लॉप ठरला. पण, त्याच्या प्रत्येक चित्रपटातील गाण्यांच्या अफाट संपत्तीमुळे तो बॉलीवूडमध्ये सगळ्यात ‘रईस’ आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या ‘बादशहा’ची वेगळी ओळख करून द्यायला नकोच! कारण, २ नोव्हेंबरला बॉलीवूडच्या कानाकोपऱ्यात फक्त एकच चर्चा असते ती म्हणजे शाहरुख खानच्या ‘मन्नत’ची!
‘डॉन’ची एक झलक पाहिली तरी भरुन पावलो असं म्हणणारे शाहरुखचे हजारो नव्हे तर लाखो ‘जबरा फॅन्स’ आजही आहेत. ३१ वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखने अनेक चढउतार पाहिले पण, चार वर्षांच्या ब्रेकनंतर ‘झिरो’मधून सुरूवात करत बॉलीवूडमध्ये त्याचा ‘डुप्लिकेट’ कोणीच होऊ शकत नाही हे त्याने सिद्ध केलं.
शाहरुख प्रत्येक चित्रपटाचा १० वर्ष पुढे जाऊन विचार करतो असं म्हटलं जातं. म्हणूनच २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेस’ची गोष्ट आताच्या पिढीला जास्त भावते. ‘स्वदेस’प्रमाणे ‘चक दे इंडिया’, ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटांना देखील बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भलेही अयशस्वी ठरले पण, प्रेक्षकांच्या मनात काय जिवंत राहिले आणि यामागचं एकमेव कारण म्हणजे यामधली गाणी!
‘स्वदेस’मधील “यू ही चला चल राही”पासून ते ‘रावन’मधल्या “दिलदारा…” पर्यंत या सगळ्या गाण्यांच्या रुपात शाहरुखला सोन्याची खाण मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जुन्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला, “आयुष्यातील कठीण प्रसंगात तुला काय करायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शाहरुखने दिलखुलासपणे “मी माझ्या चित्रपटातील “चांद तारे तोड लाऊं” हे गाणं ऐकेन असं सांगितलं होतं.
चांद तारे तोड लाऊँ – येस बॉस (१९९७)
साधारण २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या ओळीतील प्रत्येक शब्द शाहरुख खानने खरा ठरवला आहे. हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं असून अभिजीत भट्टाचार्यने गायलं आहे. हे गाणं शाहरुख खानच्या सध्याच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर शूट करण्यात आलं होतं. ९० च्या दशकात हा अवाढव्य बंगला ‘व्हिला व्हिएना’ नावाने ओळखला जायचा. त्यानंतर २००१ मध्ये शाहरुखने हा बंगला खरेदी केला. सुरूवातीला या बंगल्याचं नाव किंग खानने ‘जन्नत’ ठेवलं होतं ते पुढे बदलून २००५ मध्ये ‘मन्नत’ असं करण्यात आलं.
‘बादशहा’, ‘डॉन’ ते ‘आय एम द बेस्ट’
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बादशहा’ चित्रपटामुळे शाहरुखला इंडस्ट्रीत एक नवीन ओळख मिळाली. किंग खानच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये त्याचं स्टारडम शब्दात सांगणारी काही गाणी त्याच्या वाट्याला आली. या यादीत ‘बादशाह ओ बादशाह’ (बादशहा), ‘आय एम द बेस्ट’ (फिर भी दिल हैं हिंदुस्थानी), ‘बाजीगर ओ बाजीगर’ (बाजीगर), ‘मैं हू डॉन’ (डॉन), ‘झुमे जो पठाण’ (पठाण), ‘मैं यहा हूं’ (वीर-झारा) अशा अनेक गाण्याचा समावेश होतो. यातील प्रत्येक गाण्याचा संबंध त्याच्या लाखो चाहत्यांनी शाहरुखच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला.
शाहरुख गौरीला सोडून दिल्लीतून मुंबईला येतो हा प्रसंग आठवल्यावर आपोआप ‘वीर झारा’मधील ‘मैं यहा हूं’ हे गाणं आठवतं. पुढे मुंबईच्या समुद्रकिनारी तो गौरीला वचन देतो आणि खरंच या शहराचा ‘बादशहा’ होऊन दाखवतो. ‘आय एम द बेस्ट’ म्हणत एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून शाहरुख खान गौरीच्या घरच्यांना अखेर सांगतो ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे!’ त्याच्या या सगळ्या गाजलेल्या गाण्यांचं असंच सविस्तर वर्णन केलं, तर नक्कीच एक वेगळा चित्रपट तयार होईल यात काही शंका नाही.
‘ये दिल दिवाना’ गाण्याच्या आठवणी
‘परदेस’ चित्रपटातील ‘ये दिल दिवाना’ हे गाणं प्रचंड गाजलं. परंतु, या गाण्याच्या शूटिंगदरम्यान वेगळाच किस्सा घडला होता. या गाण्याचं शूटिंग अमेरिकेत होत असताना शाहरुखला गौरी आजारी असल्याचं समजलं. तेव्हा ती गरोदर होती आणि तिची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळाल्यावर किंग खानने थेट चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विनंती केली होती. दिग्दर्शक सुभाष घई यांनी अभिनेत्याच्या विनंतीला मान देऊन या गाण्याचं संपूर्ण शूटिंग लवकरात लवकर करायचं ठरवलं. या गाण्यात शाहरुखने प्रत्यक्षात गाडी चालवली असून तो विमानतळाच्या दिशेने प्रवास करत होता. या संपूर्ण गाण्याचं शूटिंग अवघ्या दोन तासात करण्यात आलं होतं. काही दूरच्या दृश्यांमध्ये त्याच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला होता. ‘परदेस’ चित्रपट ऑगस्ट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर १३ नोव्हेंबर १९९७ रोजी गौरीने आर्यन खानला जन्म दिला.
शाहरुखला मिळाली रोमँटिक गाण्यांची साथ
‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘सुरज हुवा मधम’, ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं’, ‘तेरे नैना’, ‘कल हो ना हो’, ‘मैं अगर कहूं’, ‘मितवा’, ‘ये दिल’ ‘तोबा तुम्हारे ये इशारे’ अशा दमदार गाण्यांमधून शाहरुखने तरुणाईला प्रेम करायला शिकवलं. रोमँटिक गाणी आणि ९० च्या दशकातील चॉकलेट बॉयच्या इमेजमुळे जगभरात शाहरुखला ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी वेगळी ओळख मिळाली. शाहरुखचे चित्रपट आणि गाणी या दोन्ही गोष्टी इंडस्ट्रीत सुपरहिट ठरत होत्या. पुढे २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रावन’ चित्रपटानंतर शाहरुखचं करिअर संपलं असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलं होता. पण, यातील ‘दिलदारा’ गाण्याने चित्रपटसृष्टीत एवढी जादू केली की, आजही ते गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये आहे. असाच अनुभव ‘रईस’ चित्रपटाच्या बाबतीत आला. ‘रईस’ने अपेक्षित कमाई केली नसली तरीही यामधील ‘जालिमा’ गाणं शाहरुखप्रेमींच्या ओठांवर आजही कायम आहे.
अभिनय-चित्रपट-गाणी या तिन्ही गोष्टींचा अचूक ताळमेळ साधला की, कलाविश्वात एक जादू होते आणि ती जादू करणाऱ्या ‘बाजीगर’चं नाव आहे शाहरुख खान. २ नोव्हेंबरला ‘मन्नत’वर जाणारा त्याचा प्रत्येक ‘जबरा फॅन’ फक्त एवढचं म्हणत असेल ‘कभी अलविदा ना कहेना!’