बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेते व अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांच्या पुढच्या पिढीने आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात पदार्पण केलं पण त्यांना हवं तितकं यश मिळालं नाही. अशाच एका दिग्गज अभिनेत्रीच्या मुलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला करिष्मा कपूर आणि आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट आठवतोय का? त्या चित्रपटातलं लोकप्रिय गाणं ‘परदेसी परदेसी जाना नही’ हे एका यशस्वी अभिनेत्रीच्या मुलीवर चित्रीत करण्यात आलं होतं.
सुपरहिट गाण्यातील ही अभिनेत्री म्हणजे प्रतिभा सिन्हा होय. ती अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी. ‘प्यासा’, ‘आंखे’, ‘गीत’, ‘अनपढ’, ‘धूल का फूल’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम करून ६० व ७० चं दशक गाजवणाऱ्या माला सिन्हा यांच्या लेकीला मात्र आईइतकं यश सिनेसृष्टीत मिळवता आलं नाही. प्रतिभा चित्रपटांमध्ये सुपरफ्लॉप ठरली. प्रतिभाला चित्रपटांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची योग्य संधी मिळाली नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ‘राजा हिंदुस्तानी’मध्येही तिची भूमिका केवळ एका गाण्यापुरती मर्यादित होती.
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
प्रतिभाच्या छोट्या करिअरमध्ये तिला बहुतेक साईड रोल मिळाले आणि यामुळे तिच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. प्रतिभाने कारकिर्दीत फक्त १३ चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु एकाही चित्रपटातून तिला आपली छाप प्रेक्षकांवर सोडता आली नाही. अशातच ती संगीत दिग्दर्शक नदीम सैफीच्या प्रेमात पडली. नदीम विवाहित असल्याने माला सिन्हांचा या नात्याला विरोध होता. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी माला यांनी प्रतिभाला चेन्नईला पाठवलं पण तरीही ते दोघे संपर्कात होते. नंतरच्या काळात मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि या मायलेकीने नदीम यांच्यावर गंभीर आरोप केले. ते सर्व आरोप नदीम यांनी फेटाळले होते. आपण फक्त प्रतिभाला मदत करू इच्छित होतो, असं ते म्हणाले होते.
नदीमबरोबरच्या प्रेमाचा दुःखद अंत झाला. त्यानंतर प्रतिभा इंडस्ट्रीपासून दुरावली. प्रतिभा शेवटची २३ वर्षांपूर्वी २००० मध्ये आलेल्या ‘ले चल अपने संग’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती इंडस्ट्री आणि प्रकाशझोतापासून दूर गेली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रतिभा सध्या तिची आई माला सिन्हाबरोबर मुंबईतील वांद्रे भागात राहते. तर ती कोलकात्यात राहत असल्याचा दावाही केला जातो.