बॉलीवूडचे सुपरस्टार आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे तर, जगभरातही करोडो चाहते आहेत. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. आपल्या करिअरमध्ये अमिताभ यांनी ‘शोले’, ‘डॉन’, ‘सिलसिला’, ‘शान’, ‘जंजीर’, ‘महान’, ‘कालिया’ अशा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’बाबत दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “केरळमधील मुस्लीम मुलीने मला मेसेज…”

१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. यामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर ‘विजय’ हे पात्र साकारले होते, यानंतर चित्रपटसृष्टीत अमिताभ यांना ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ११ मे २०२३ रोजी, ‘पन्नास’ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

अमिताभ बच्चन यांचे सर्व चाहते ‘झी-५’ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. IMDb वर या चित्रपटाला ७.५ असे रेटिंग देण्यात आले आहे. ५० वर्षे पूर्ण झाल्यावर आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आता चित्रपट ओटीटीवर येत असल्याने अमिताभ यांच्या चाहते आणि प्रेक्षकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : सोनाक्षीने अखेर वडिलांची ‘ती’ इच्छा केली पूर्ण; म्हणाली, “मी त्यांना फोटो पाठवला अन्…”

अमिताभ बच्चन यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. एकाच वेळी १२ चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही उत्सुक नव्हते. परंतु जेव्हा त्यांना ‘जंजीर’ चित्रपटासाठी कास्ट केले तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. अभिनेते ‘प्राण’ यांनी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला होता आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला ‘जंजीर’साठी अपेक्षित नायक नक्कीच भेटेल असे सांगितले होते. ‘प्राण’ यांच्या सल्ल्यानुसार, दिग्दर्शक प्रकाश मेहरांनी ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपट पाहिला आणि यातील अमिताभ बच्चन यांचा एक सीन पाहून त्यांना इतका आनंद झाला की, त्याच वेळी त्यांनी अमितजींना ‘जंजीर’ चित्रपटासाठी कास्ट केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar amitabh bachchan zanjeer movie release on ott platform zee 5 sva 00
Show comments