बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान ‘दबंग टूर’च्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष जगभरात विविध ठिकाणी कार्यक्रम करीत आहे. ‘दबंग टूर रिलोडेड एंटरटेनमेंट कॉन्सर्ट’च्या माध्यमातून सलमान खान अनेक दिवसांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आता सलमानच्या आगामी ‘दबंग टूर’चे आयोजन कोलकाता येथे करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीच्या आरोपांवर निर्मात्यांनी सोडले मौन म्हणाले, “तिच्या बेशिस्तपणामुळे…”

सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कोलकाता येथील ‘दबंग टूर’ पुढे ढकलण्यात आली होती. त्याच्या यापूर्वीच्या ‘दबंग टूर’चे आयोजन दुबईमध्येही करण्यात आले होते. आता १३ मे रोजी सलमानच्या उपस्थितीत कोलकाता येथील ऐतिहासिक ईस्ट बंगाल क्लबमध्ये ‘दबंग टूर’ कॉन्सर्ट सोहळा रंगणार आहे.

सलमानच्या या टूरमध्ये चाहत्यांना तिकीट काढून सहभागी होता येणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, येथील वेगवेगळ्या झोनमधून कॉन्सर्टचा आनंद घेण्यासाठी ६९९ ते ३ लाख रुपयांपर्यंतची तिकिटे उपलब्ध आहेत. साध्या तिकिटांचे दर ६९९ रुपयांपासून ते ४० हजारांपर्यंत असून तुम्हाला व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश हवा असल्यास, त्यासाठी तब्बल २ लाख ते ३ लाख रुपये मोजावे लागतील.

हेही वाचा : ‘हॅपी मॅरीड लाइफ’साठी दीपिकाने दिला खास सल्ला; रणवीरविषयी सांगताना म्हणाली…

सलमान खानसह ‘दबंग टूर’ कॉन्सर्टसाठी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्दर्शक प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, गायक गुरु रंधावा, अभिनेता आयुष शर्मा आणि मनीष पॉल यांसारखे अनेक कलाकार कोलकातामध्ये सलमानबरोबर परफॉर्म करतील. दरम्यान, दबंग टूरवर असताना सुपरस्टार सलमान खान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader