‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डाने वीर सावरकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्याने स्वत: केलं आहे. याबाबत आता मराठीसह बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी खास पोस्ट शेअर करत बालपणीची आठवण सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया पिळगांवकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बालपणीचा खास प्रसंग सांगितला आहे. याआधी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील पोस्ट शेअर करत या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.

हेही वाचा : लग्नाला १३ वर्षे होऊनही बा नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

“मी १२ वर्षांची असताना वडिलांनी मला शाळेच्या सुट्ट्यांमध्ये एक पुस्तक वाचायला आणून दिलं होतं. ते पुस्तक अगदी जाडजूड होतं. अर्थात सुट्टी पूर्ण होईल तोपर्यंत माझं पुस्तक वाचून होईल असं वडिलांना अपेक्षित होतं. परंतु, ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण वाचून होईपर्यंत मी ते पुस्तक बाजूला ठेऊ शकले नाही. सुरुवातीला पुस्तक वाचायला घेतल्यावर अनेक अडथळे आले. मी मध्येच रडत होते, हुंदके देत होते. अर्ध पुस्तक वाचल्यावर मी अगदीच सुन्न झाले होते. ते पुस्तक वीर सावरकरांच्या चित्रपटाच्या रुपात आता पुन्हा जिवंत झालं. पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप! तुम्ही चित्रपट पाहिलात का?” अशी पोस्ट शेअर करत सुप्रिया पिळगांवकरांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video : रंग बरसे भीगे चुनरवाली…; बिग बींच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, स्पर्धकांसह केला जबदरस्त डान्स

दरम्यान, सुप्रिया पिळगांवकर यांच्या पोस्टवर “पुस्तकाचा पहिला परिच्छेदच इतका जबरदस्त आहे की त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर ही मानसिक दृष्ट्या किती कणखर होते हे लक्षात येतं.”, “चित्रपट पाहताना अंगावर काटा आला” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie and shares memory of her childhood sva 00