Jiah Khan Suicide Case: अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाडून हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सूरज पांचोलीने पोस्ट शेअर केली आहे.

सूरज पांचोलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. “सत्याचा नेहमीच विजय होतो,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सूरज पांचोलीने केलेल्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

suraj-pancholi-post

हेही वाचा>> Jiah Khan Case Verdict: “माझ्या मुलासाठी प्रार्थना करा”, सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या “गेली १० वर्षे…”

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता आदित्य पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने २५ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता. आज याप्रकरणात अंतिम निकाल देत न्यायालयाने सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे.

Story img Loader