एकेकाळी सलमान खान व विवेक ओबेरॉय यांचा वाद बॉलीवूडमध्ये चांगलाच गाजला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान खान व ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत होते. पण नंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला. मग ऐश्वर्याने सलमान खानशी ब्रेकअप केलं आणि विवेकबरोबर रिलेशनशिपमध्ये आली. यावरून सलमान खान व विवेकचं भांडणं झालं, सलमानने विवेकचं करिअर संपवण्याची धमकीही दिली होती. या वादानंतर २००३ मध्ये विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायचे ब्रेकअप झाले आणि तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं होतं.

या संपूर्ण प्रकरणानंतर विवेकचे वडील व ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचे अमिताभ बच्चन व सलमान खानच्या कुटुंबाशी संबंध कसे आहेत, याबाबत माहिती दिली आहे. सुरेश हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरच्या आजोबाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानिमित्त त्यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी मुलगा विवेक व ऐश्वर्या राय यांच्या एकेकाळी गाजलेल्या अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

Video: बिग बी आले, विहीणबाईंना भेटले अन्…; अनफॉलो केल्याच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय समोर आल्यावर काय घडलं?

“बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. विवेकने मला त्याबद्दल कधीच सांगितलं नाही. रामूने (राम गोपाल वर्मा) मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. रामूच्या आधी मला अजून कुणीतरी सांगितलं होतं, त्यावेळी मी विवेकला समजावलं होतं की हे सगळं करू नकोस,” असं विवेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय म्हणाले.

“मी त्याला…”, विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायच्या अफेअरबद्दल कळाल्यावर ‘अशी’ होती वडील सुरेश ओबेरॉय यांची प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन आणि आपण कधीच मित्र नव्हतो, असं त्यांनी सांगितलं आहे. “मी त्यांचा (अमिताभ बच्चन) कधीच मित्र नव्हतो. मी त्यांचा को-स्टार होतो. आमचं नातं कामापुरतं होतं. अमिताभ बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसासाठी बोलावलं होतं, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. तसंच ते बऱ्याच गोष्टी लोकांना कळू देत नाहीत. मात्र जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप छान वागतो,” असं सुरेश ओबेरॉय यांनी सांगितलं.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

सुरेश ओबेरॉय यांनी सलमान खान आणि सलीम खान यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. “मी खान कुटुंबाबरोबर विवेकच्या प्रकरणात निश्चिंत होतो. आम्ही सगळे एकमेकांना भेटतो. जेव्हा सलमान खान मला भेटतो तेव्हा तो मला पाहून त्याची सिगारेट लपवतो, मग तो आदराने माझ्याशी बोलतो. मी नेहमी विवेकला सलीमजींच्या पाया पडायला सांगतो. मी सलीम भाईंचा आदर करतो. काही गोष्टी घडल्या असल्या तरी पण माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत,” असं सुरेश ओबेरॉय यांनी नमूद केलं.

Story img Loader