दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत, तसेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत. एकेकाळी गाजलेल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मानवची भूमिका साकारून सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधलं आणि त्याला चित्रपट मिळाले. त्याने ‘काय पो चे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’ आणि क्रिकेटपटू एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. पण १४ जून २०२२ रोजी सुशांतने राहत्या घरी आत्महत्या केली आणि सर्वांनाच धक्का बसला होता.
सुशांतने काही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्याने आमिर खान आणि अनुष्का शर्माच्या ‘पीके’ चित्रपटात छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये मानधन घ्यायचा. पण या चित्रपटातील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याने राजकुमार हिराणीकडून एकही रुपया घेतला नाही. भूमिका लहान पण महत्त्वाची होती, त्यामुळे सुशांतने मानधन घेण्यास नकार दिला होता. नंतर राजकुमार हिरानी यांनी सुशांतला २१ रुपये शगुन म्हणून दिले होते आणि अभिनेत्याने ते आनंदाने स्वीकारले होते.
“त्याला केवळ २ तास…” कियारा अडवाणीने केलेला सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल खुलासा
‘पवित्र रिश्ता’ मालिका गाजल्यानंतर सुशांतला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवडूमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केले. ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘एम.एस.धोनी’, ‘छिछोरे’ या चित्रपटांनी त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. पण यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतने १४ जून २०२० रोजी गळफास घेतला आणि जीवन संपवलं होतं.