Sushant Singh Rajput Birthday: हरहुन्नरी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिवस आहे. त्यामुळे सध्या त्याचे चाहते आणि इतर कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आठवणी शेअर करत जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने अभिनेत्याचा एक व्हिडीओ शेअर करत त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सुशांतची बहीण श्वेता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी सुशांतच्या आठवणी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सुशांतची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आज तिने भावाच्या जन्मदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर झाली आयशा खान, जाता-जाता मुनव्वर फारुकीला म्हणाली…

श्वेताचे सुशांतचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “माझ्या सोन्यासारख्या भावाला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर अमर्यादित प्रेम करते. मला आशा आहे की, तू लाखो लोकांच्या हृदयात आहेस आणि तू त्यांना काहीतरी करण्यासाठी आणि चांगले बनण्यासाठी प्रेरित करत आहेस. तुझा वारसा पुढे चालत राहिलं. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्टार. तू नेहमी चमकत राहा आणि आम्हाला मार्ग दाखव.”

श्वेता सिंह किर्तीच्या या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी तसेच काही कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वजण सुशांतला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – डीपफेक व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीच्या अटकेनंतर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “दिल्ली पोलिसांचे…”

दरम्यान, २१ जानेवारी १९८६ रोजी सुशांतचा बिहारमध्ये जन्म झाला होता. त्याने अभिनय क्षेत्रातील सुरुवात ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेपासून केली होती. पण तो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाला. त्यानंतर सुशांतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मग त्याने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. पण १४ जून २०२०मध्ये मुंबईतील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आज सुशांत आपल्या नसला तरी त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

Story img Loader