दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं आत्महत्या प्रकरण पून्हा चर्चेत आलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या निधन प्रकरणात नवा खुलासा केला. त्यानंतरही सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती दिली आहे. अमेरिकेमुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुढे सरकू शकली नसल्याची अपडेट समोर आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“सुरुवातीला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. उपलब्ध माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती, नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितलं की त्यांच्याकडे खटल्याच्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपासत आहेत. ते विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारे कारवाई केली जाईल,” असं फडणवीस म्हणाले होते.

बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती, नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाशी अमेरिकेचा काय संबंध?

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, तीन वर्षांनंतरही अमेरिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने सीबीआय अंतिम निकालापर्यंत पोहोचू शकलेली नाही. या प्रकरणी अमेरिकेकडून काही टेक्निकल पुरावे मागवण्यात आले होते, पण ते अजून मिळालेले नाहीत. अहवालानुसार, २०२१ मध्ये एजन्सीने कॅलिफोर्नियातील गूगल व फेसबूकच्या मुख्यालयाला सुशांतच्या सर्व डिलीटेड चॅट, ईमेल आणि पोस्टशी संबंधित माहिती मागवण्यात आली होती, जेणेकरून या प्रकरणाचा तपास करण्यास मदत होईल.

महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

‘हिंदुस्तान टाइम्स’ने एका सीबीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही अजूनही टेक्निकल पुराव्यांसाठी अमेरिकेच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्ही या प्रकरणात निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू. त्या पुराव्यांअभावीच या प्रकरणाचा तपास रखडला आहे.”

Story img Loader