१४ जून २०२० रोजी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आत्महत्या करत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना जबर धक्का बसला होता. आज त्या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याची बहीण श्वेता सिंह हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
श्वेताने सुशांतबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्याबरोबरच तिने काही पुस्तकांचे फोटोही पोस्ट केले आहेत. “लव्ह यू भाई, तुझ्या बुद्धिमत्तेला सलाम. मला क्षणोक्षणी तुझी आठवण येते. पण तू माझ्यातीलच एक भाग आहेस, हे मला माहीत आहे. श्वासाइतका तू माझा अविभाज्य भाग आहेस. त्याने मला शिफारस केलेली काही पुस्तके शेअर करत आहे. त्याचं अस्तित्व जपत त्याला जगू दे,” असं म्हणत सुशांतच्या बहिणीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
तीन वर्षांपूर्वी करोना काळात सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड हळहळलं होतं. सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. पवित्र रिश्ता या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांत काम करून त्याने बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.