बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूने मनोरंजन विश्वात खळबळ माजली होती. दिशाने ८ जून २०२० रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. दिशाने १४व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली होती. आज दिशा सालियनचा वाढदिवस आहे.
दिशाचा जन्म २६ मे १९९२ रोजी मुंबईत झाला होता. दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची दिशा मॅनेजर होती. तिने भारती सिंह व वरुण शर्मा यांसारख्या कलाकारांबरोबरही काम केलं होतं. दिशाच्या आत्महत्येनंतर सात दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं होतं. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दिशा चर्चेत आली होती.
आत्महत्या केल्यानंतर दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिशाच्या बर्थडे निमित्त आयोजित केल्या गेलेल्या पार्टीमधील तो व्हिडीओ होता. त्या पार्टीत दिशा मित्रमैत्रिणींबरोबर डान्स करताना दिसत होती. मीडिया रिपोर्टनुसार, या पार्टीनंतर दिशाने लंडनमधील तिच्या मैत्रिणीला कॉल केला होता. त्यानंतर ती भावुक झाली होती.
हेही वाचा>>“काही व्यक्ती …”, विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया भावुक, शेअर केली खास पोस्ट
दिशाने आत्महत्या केली त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा तिच्या जवळच्या मित्राने केला होता. ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्याने “९ जूनच्या रात्री तिचे काही मित्र व बॉयफ्रेंड रोहनसह ती पार्टी करत होती. त्यावेळी ती थोडी दारुही प्यायली होती. सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक ‘कोणालाच कोणाची काळजी नाही’, असं म्हणत तिने स्वत:ला बेडरुममध्ये बंद करुन घेतलं. काहीवेळाने तिच्या मित्रांनी बेडरुमचा दरवाजा ठोठावला. बराच वेळ दिशाने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने नंतर नाईलाजाने बेडरुमचा दरवाजा आत तोडून ते आतमध्ये गेले,” असं सांगितलं होतं.
हेही वाचा>> “थोडीतरी लाज…”, ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
“दिशाने बाल्कनीतून उडी मारल्याचं त्यांना कळताच ते थेट खाली उतरले. तोपर्यंत वॉचमॅनने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. जेव्हा दिशाला तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती. पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं”, असा खुलासा तिच्या जवळच्या मित्राने केला होता.