बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती रोडीजच्या नव्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एमटीव्ही रोडीजच्या १९व्या सीझनमध्ये रिया गँगलीडर म्हणून सहभागी होणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओही एमटीव्हीकडून प्रदर्शित करण्यात आला होता. रियाच्या या व्हिडीओनंतर सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांका सिंहने केलेलं ट्वीट व्हायरल झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांतच्या बहिणीने ट्वीटमध्ये “तू का घाबरशील? तू तर वेश्या होतीस, आहेस आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझे उपभोगता कोण आहेत? कोणीतरी सत्ताधारीच अशी हिंमत दाखवू शकतो. सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये होणाऱ्या विलंबासाठी कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट झालं आहे,” असं म्हटंल होतं. तिच्या या ट्वीटचा संबंध रियाशी जोडला गेला होता. रियाने रोडीजच्या या व्हिडीओमध्ये “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार?…मी घाबरले?…आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे,” असं म्हटलं होतं.

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीकडून रिया चक्रवर्तीचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख? ‘ते’ ट्वीट व्हायरल

सुशांतच्या बहिणीने ट्वीटमधून रियाचा उल्लेख वेश्या म्हणून केल्याची चर्चा होती. आता प्रियांका सिंहने तिच्या या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. प्रियांकाने ट्वीट करत “मी कोणत्याही व्यक्तीला उद्देशून ट्वीट केलं नव्हतं. जगात घडणाऱ्या गोष्टींबाबत मी हे ट्वीट केलं होतं,” असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> सुश्मिता सेनला शूटिंग करताना सेटवरच आला होता हृदयविकाराचा झटका, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला “तिची प्रकृती…”

तीन वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईत आत्महत्या करत जीवन संपवलं. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput sister clarifies on tweet you are prostitute rhea chakraborty kak