बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर चाहत्यांना जबर धक्का बसला होता. आज रक्षाबंधनानिमित्त सुशांतची बहीण श्वेता सिंह हिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

श्वेता सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने त्याच्या आठवणीत जुन्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन शेअर करत त्याला रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

श्वेता सिंहची पोस्ट

“मला कधी कधी असं वाटतं की तू कुठेही गेला नाहीस, तू इथेच आहेस. पण कधी कधी असं वाटतं की आता मी तुला भेटू शकणार नाही, तुझ्याशी बोलू शकणार नाही. तुझं हसणं, तुझा आवाज मला कधीच ऐकू येणार नाही. तुला गमावल्याचं दु:ख मला कुणासोबत वाटून घ्यायचं असलं तरी मी ते करु शकत नाही. कारण ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, इतकेच जवळचं की ते व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत.

दिवसेंदिवस वेदना वाढत चालल्या आहेत. या भौतिक जगाचा आणि त्याच्या क्षणभंगुर स्वरुपाचा पर्दाफाश होत आहे. ज्यासाठी ईश्वर हा एकमेव उपाय आहे. मी आशा करते की लवकरच आपली पुन्हा एकदा भेट होईल. तोपर्यंत तुझ्या मनगटावर ही राखी बांधते आणि प्रार्थना करते की तुम्ही कुठेही असशील तिथे आनंदात राहा. खूप खूप प्रेम”, असे सुशांतची बहीण श्वेता सिंहने म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. त्याच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात दाखल केली. त्याच्या मृत्यूचं प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.

Story img Loader