दिवंगत अभिनेता सुशात सिहं राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे. गळफास घेतेलल्या आणि खून झालेल्या मृतदेहात खूप फरक असतो. सुशांतच्या गळ्यावर असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. त्याच्या अंगावरही मारहाणीचे व्रण दिसत होते असा दावा कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आता सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा काय?
“सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.
सुशांतच्या बहिणीची दाव्यावर प्रतिक्रिया
सुशांतची आत्महत्या नव्हती, तर हत्या होती, असा दावा करणाऱ्या रूपकुमार शाह यांचा एक व्हिडीओ सुशांतची बहिणी श्वेता सिंह किर्तीने शेअर केला आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेची मागणीही तिने केली आहे. “सुशांतच्या मृत्यूचा खुलासा करणारे रुपकुमार शाह सुरक्षित राहतील, याची आपल्याला खात्री करावी लागेल, सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी,” असं तिने ट्वीट केलंय. तसेच या ट्वीटमध्ये श्वेताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनाही टॅग केलंय.
बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. आता या नव्या दाव्याचा तपास केला जातो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.