दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कूपर रुग्णालयातील सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या टीममधील एका कर्मचाऱ्याने त्याचा खून झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकरणाने पुन्हा लक्ष सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत सिंह राजपूतचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतच्या फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचं फॅन्सचं म्हणणं आहे. या व्हिडीओमध्ये सुशांतचे केस विस्कटलेले दिसत आहेत. दाढी वाढली असून बोलतानाही तो अडखळत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सुशांतच्या मृत्यूला रिया चक्रवर्तीला जबाबदार धरत तिला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट

हेही वाचा>> राजेश खन्ना यांनी लेकीच्या जन्मानंतर सहा महिने पाहिलाच नव्हता तिचा चेहरा, कारण…

“सुशांतची काय अवस्था केली होती”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “रियाने एवढ्या प्रतिभावान मुलाला मारलं. तिला नर्कातही जागा मिळणार नाही”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “ड्रग्ज देऊन सुशांतला मारुन टाकलं”, असंही एका युजरने म्हटलं आहे.

हेही वाचा>> “शिझान खानला फाशी द्या”, तुनिषा शर्माच्या आईला भेटल्यानंतर रामदास आठवलेंची मागणी

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या सुशांतने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येही नाव कमावलं होतं. परंतु, १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput suicide actor old video goes viral netizens troll rhea chakraborty kak