बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा आज ४७वा वाढदिवस आहे. सुश्मिताने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या सौंदर्यानेही अनेकांना भुरळ पाडली. ‘दस्तक’, ‘सिर्फ तुम’, ‘चिंगारी’, ‘मैं हू ना’, ‘वास्तू शास्त्र’ अशा एक सो एक हिट चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या, ‘मिस युनिव्हर्स’चा किताब नावावर करणाऱ्या सुश्मितालाही विनयभंगासारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

सुश्मिताने एका मुलाखतीदरम्यान हा प्रसंग सांगितला होता. या मुलाखतीत सुश्मिताला “तुझ्याबरोबरही विनयभंग किंवा छळ करण्याचा प्रयत्न झाला आहे का?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सुश्मिताने काही वर्षांपूर्वी तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “एका मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे खूप माणसं होती, त्यामुळे हे कोण करत आहे हे मला समजणार नाही, असं त्याला वाटत होतं. मी त्याचा हात पकडला व त्याला ओढलं. त्याला बघताच मला धक्काच बसला. कारण तो फक्त १५ वर्षाचा मुलगा होता. मी त्याची मान पकडली व त्याला बाजूला घेऊन गेले”.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> रवी जाधव अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवणार, पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका

हेही वाचा >> Video: शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

“मी जर आरडाओरडा केला किंवा रडायला लागले तर तुझं आयुष्य संपून जाईल. चूक तर तू केली आहेस. फक्त आता ती मान्य कर”, असं त्या मुलाला म्हटल्याचं सुश्मिताने सांगितलं. त्या मुलाने चूक मान्य केल्यानंतर सुश्मिता त्याला म्हणाली, “तुला माहीत आहे का, असं केल्याने तुझ्या आयुष्याची वाट लागेल”. त्यानंतर त्या मुलाने कुठल्याही मुलीचा विनयभंग करणार नाही, अशी सुश्मिताला खात्री पटवून दिली.

हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

पुढे सुश्मिता म्हणाली, “हाच फरक आहे. त्या १५ वर्षीय मुलाला हे सगळं मजा म्हणून केलं जातं, असं वाटत होतं. या गोष्टी किती गंभीर आहेत, हे त्याला कोणीही शिकवलं किंवा सांगितलं नव्हतं, हे मला जाणवलं. ही खूप मोठी चूक आहे”. सुश्मिता ‘ताली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक ललित मोदी यांच्याबरोबरच्या रिलेशनशिपमुळे सुष्मिता चर्चेत आली होती. सुश्मिताने अद्याप लग्न केलं नसून तिने रेनी व अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.

Story img Loader