बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘मिस युनिव्हर्स’ बनणारी ती पहिली भारतीय महिला होती. आज २१ मे हा दिवस सुष्मिताच्या आयुष्यातील एक खास दिवस आहे. कारण २९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. २१ मे १९९४ रोजी मनिला येथे सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. या खास दिवसानिमित्त सुष्मिताने एक जुना फोटो शेअर करत एक खास नोट लिहिली आहे.
सुष्मिताने फोटो शेअर करत लिहिले, “हा फोटो २९ वर्षे जुना आहे, फोटोग्राफर प्रबुद्ध दास गुप्ता यांनी हा फोटो शूट केला आहे. या चित्रात त्याने एका १८ वर्षांच्या मुलीला सुंदरपणे कॅप्चर केले आहे. एकदा हसत हसत तो म्हणाला, ‘मी शूट केलेली तू पहिली मिस युनिव्हर्स आहेस याची तुला जाणीव आहे?’ मी अभिमानाने म्हणाले, खरंच माझ्याकडे भारताची पहिली मिस युनिव्हर्स आहे.”
सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “माझ्या देशासाठी प्रतिनिधित्व करण्याचा आणि जिंकण्याचा बहुमान आणि भावना इतकी खोल आहे की, आजही ते आठवताना आनंदाश्रू येतात. २९ वर्षांनंतर! मी हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करते आणि लक्षात ठेवते, कारण इतिहास साक्षी आहे, भारताने २१ मे १९९४ रोजी मनिला #फिलीपिन्स येथे पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली.” सुष्मिताच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्रिटीही अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा- शरद केळकरने सांगितला ‘आदिपुरुष’च्या हिंदी डबिंगचा अनुभव, म्हणाला “दिग्दर्शकाला पहिल्या दिवसापासून…”
सुश्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आगामी काळात ती ‘आर्य ३’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या सुश्मिता सेन ‘आर्य ३’मुळे खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या मागील दोन सीझनमध्ये तिने आपल्या अभिनयातून सर्वांची मने जिंकली होती. लवकरच सुश्मिता सेनचा ‘आर्य ३’ OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.