Sushmita Sen Rohman Shawl : बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने सध्या ती कोणालाही डेट करत नसल्याचं म्हटलं आहे. तिने तिच्या डेटिंगसंबंधित सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. ती एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र तिने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की ती गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे. तिचे बरेच जवळचे मित्र आहेत, पण ती कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. दुसरीकडे रोहमन शॉलने दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे.

‘हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट’नुसार, सुश्मिता सेन म्हणाली, “माझ्या आयुष्यात एकही पुरुष नाही. मी काही काळापासून सिंगल आहे. जवळपास दोन वर्षे झालीत मी सिंगल आहे. २०२१ पासून मी कोणत्याही नात्यात नाही. माझ्या आयुष्यात काही खूप चांगले लोक आहेत जे माझे मित्र आहेत आणि ते सर्व फक्त त्या क्षणाची वाट पाहत असतात जेव्हा मी त्यांना कॉल करते आणि म्हणते, ‘मी कार बाहेर काढत आहे, मागच्या सीटवर बसा. आपण गोव्याला जातोय.”

“१८व्या वर्षी मुलाखतीत सेक्स शब्द उच्चारला अन्…”, सुश्मिता सेनने सांगितला प्रसंग; म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी मला…”

४८ वर्षीय सुश्मिताने सांगितलं की ती डेटिंगमधून ब्रेक घेत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. “मला सध्या कोणातच रस नाही. ब्रेक घेणं चांगलं वाटतंय, कारण मी जवळजवळ पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि तो बराच मोठा काळ होता,” असं सुश्मिता सेन म्हणाली.

Sushmita Sen ex boyfriend Rohman Shawl
सुश्मिता सेन व रोहमन शॉल (फोटो – इन्स्टाग्राम)

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

रोहमन शॉलची प्रतिक्रिया (Sushmita Sen Rohman Shawl Relation)

सुश्मिता सेनबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं असता रोहमन शॉल म्हणाला, “गेल्या सहा वर्षांपासून आम्ही सोबत आहोत. आम्ही आधीपासूनच चांगले मित्र आहोत आणि ही मैत्री कायम राहील. आमच्यात काहीतरी खास बाँड आहे जो दिसून येतो.”

दरम्यान, रोहमन शॉल व सुश्मिता सेन बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. सुश्मितापेक्षा रोहमन १५ वर्षांनी लहान आहे. दोघांनी २०२१ मध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काही काळ हे दोघेही एकत्र दिसत नव्हते. पण सुश्मिता सेनला हार्ट अॅटक आल्यानंतर पुन्हा रोहमन व सुश्मिता एकत्र अनेक इव्हेंट्सना हजेरी लावतात. दोघेही एकमेकांबरोबर व्यायाम करतानाही दिसतात. त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. रोहमनचं सुश्मिताच्या मुली रेने व अलिसा यांच्याशी पण खूप चांगलं बाँडिंग आहे.