बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. हृदयविकाराचा धक्का येऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच सुश्मिता रॅम्पवर परतली आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची ‘अशी’ आहे अवस्था, अभिनेत्रीने शेअर केला फोटो
लॅक्मे फॅशन वीकने सुष्मिता सेनचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती गोल्डन रंगाचा सुंदर आउटफिट घालून रॅम्पवर चालताना वॉक करताना दिसत आहे. तिने हातात एक सुंदर पुष्पगुच्छही घेतला होता. तिने रॅम्प वॉक करत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.
हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची प्रकृती सध्या चांगली आहे. तिने व्यायामही सुरू केला असल्याची माहिती दिली होती. अशातच तिला रॅम्पवर बघून चाहते खूश झाले आहेत. रॅम्प वॉक करताना सुष्मिता सेनच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. तिने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला.
सुश्मिता सेन अनुश्री रेड्डीसाठी शो स्टॉपर बनली होती. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. अनेकांनी ‘क्वीन इज बॅक’ अशा कमेंट्स व्हिडीओवर केल्या आहेत.